shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्म करायचे असेल तर धर्म अगोदर ओळखा -ह.भ.प.कविराज महाराज झावरे.


रामवाडी साईबाबा मंदिर येथे किर्तन करताना पंढरपूर येथे किर्तन केल्याची अनुभूती - ह.भ.प.कविराज महाराज झावरे

वाळकी प्रतिनिधी : गुंडेगाव रामवाडी येथील साईबाबा मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच चार दिवसीय किर्तन महोत्सवाची बुधवार (दि.२२) प्रथम दिनी भक्तिमय वातावरणात ह.भ.प. कविराज महाराज झावरे यांच्या किर्तन सेवेने संपन्न झाला यावेळी त्यांनी आपल्याला किर्तनातून मिळणारा मुख्य उपदेश म्हणजे भगवंताचे नामस्मरण, चित्तशुद्धी, आणि प्रपंच सांभाळून परमार्थ साधणे हा होय.आयुष्य वाया न घालवता देवाची भक्ती करणे, अहंकार सोडणे आणि मनाची एकाग्रता राखणे हे कीर्तनाचे मूळ उद्दिष्ट आहे.

      तसेच रामवाडी, गुंडेगाव साईबाबा मंदिर येथे किर्तन करताना पंढरपूर येथे किर्तन केल्याची अनुभूती,किर्तन विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे ,देवाला ओळखण्याची भूमिका असावी लागते ,प्रपंचात राहून ही परमार्थ साधता येतो ,साईबाबा ची भक्ती जर केली कधीच काही कमी पडत नाही,साईबाबाची माया म्हणजे दुःखातून बाहेर काढणारी माय,साईबाबामुळे रामवाडी मध्ये एवढं वैभव आहे की भविष्यात काहीच संकट येणार नाही,कर्म करायचे असेल तर धर्म अगोदर ओळखा,वारकरी सांप्रदाय सांगतो धर्माचे पालन करा असे आपल्या किर्तन सेवेतून सांगितले.
        यावेळी प्रसिद्ध गायणाचार्य नारायण महाराज खिल्लारी (गुरुजी),ह.भ.प.सुनिल महाराज पवार यांच्यासारख्या गायणाचार्यांच्या रसाळ, मधूर गायण व टाळ, मृदंगाच्या तालावर देवाच्या नामाचा जप करत लोक तल्लीन होऊन जात आहेत.त्यांचे भक्ती संगीताचे कंपन मनाला शांत करते आणि आनंद देत आहेत अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.
       या किर्तन सोहळ्याने पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत.कार्यक्रम नियोजन व आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, रामवाडी ग्रामस्थ अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
close