shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि. प. शाळा भोसलेवस्ती येथे इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी वातावरणात पार.

जि. प. शाळा भोसलेवस्ती येथे इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी वातावरणात पार.
इंदापूर: जि. प. शाळा भोसलेवस्ती येथे इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. आशा नष्टे यांनी प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या प्रास्ताविकाने  केली. त्यांच्या प्रत्येक शब्दातून विद्यार्थ्यांबद्दलची माया आणि अभिमान ओसंडून वाहत होता.
विद्यार्थी आणि पालकांनी आपली मनोगते व्यक्त करताना अनेक आठवणींना उजाळा दिला. चार वर्षांचा शाळेतील प्रवास, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींसोबतचे क्षण—हे सगळं आठवताच अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. निरोपाचा तो क्षण प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. शाळा सोडताना विद्यार्थ्यांच्या मनात *आनंद आणि विरह यांचा एक वेगळाच संगम* दिसून आला.
या प्रसंगी *केंद्रप्रमुख संभाजी आजबे * यांनी कार्यक्रमास भेट देऊन इयत्ता ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांच्या मनात नव्या आशा आणि उमेदीची ज्योत प्रज्वलित झाली.
यानंतर इयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी *स्नेहभोजनाचे आयोजन* करण्यात आले होते. या स्नेहभोजनामुळे वातावरणात थोडा आनंदाचा रंग भरला, पण तरीही निरोपाची हुरहूर प्रत्येकाच्या मनात होतीच.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी *शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी मनापासून सहकार्य केले*. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन लतीफा पठाण मॅडम, मेघा थोरवे मॅडम, रमेश बरळ सर, समाधान भोंग सर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडले.
कार्यक्रमाचे *सुत्रसंचालन भारत ननवरे सर* यांनी प्रभावीपणे केले, तर शेवटी *राजेंद्र भोंग सर यांनी आभार प्रदर्शन* करताना सर्वांच्या भावनांना शब्द दिले.
*हा निरोप समारंभ केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा, डोळ्यांत पाणी आणणारा आणि कायम स्मरणात राहणारा सुंदर क्षण ठरला.*
close