उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भोईटे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सायंबाच्यावाडीत
इंदापूर (बारामती) : बारामती विधानसभा पोट निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असून मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी बारामती तालुक्यातील सायंबाच्यावाडीत इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भोईटे तसेच संचालक कैलासराव केरळकर, ज्येष्ठ नेते हिंदुराव भोईटे, हनुमंतराव शिंदे, नवनाथ शिंदे, हिम्मत गुप्ते इत्यादी कार्यकर्ते संचालक मंडळ तसेच सायबाच्या वाडीतील सरपंच जालिंदर भापकर ,उपसरपंच हनुमंत बांदल, पोलीस पाटील गोविंद जगताप ,गावातील जेष्ठ नेते दिलीप जगताप, रामचंद्र भापकर,बूथ प्रमुख उत्तम भापकर उपस्थित होते
सर्व प्रमुखांच्या व गावातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाहेरील मतदार व स्थानिक मतदार यांचे जास्तीत जास्त मतदान श्रीमती सुनेत्रा पवार यांना घडवण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकाऱ्यांनी ठामपणे केलेला आहे . यानुसार इंदापूर तालुक्याचे आमदार तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार चालू असल्याची माहिती भोईटे यांनी दिली. तसेच उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बारामती तालुक्यातील मतदारांनी सर्वात जास्त मतदानाने निवडून आणण्याचा संकल्प केला असल्याची माहिती अमोल भोईटे यांनी दिली.

