shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माहिती देण्यास टाळाटाळ; उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी..कोट्यावधी रुपयाचा गैर व्यवहार सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
नेवासा ।  मुळा पाटबंधारे 
विभागांतर्गत उजवा कालवा व मुळा डावा कालवा परिसरात कार्यारंभ२०२४-२५ या कालावधीत झालेल्या कामांची पडताळणी केली असता निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवूनही संबंधित कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.
 
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली असून, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहितीही दिली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राहूरी, नेवासा, चिलेखणवाडी, घोडेगाव, अमरापूर या परिसरात

कामे न करता बोगस बिले काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. माहिती न दिल्याबद्दल संबंधित कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा अधिकाऱ्यावर इशारा सामाजिक कार्यकर्ते मोहन शेगर यांनी निवेदनाद्वारे दिला.
close