‘सार्वमत शिलेदार’ पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीत आनंदोत्सव
शिर्डी प्रतिनिधी : (तुषार महाजन)
दैनिक सार्वमतच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय प्रतिष्ठेचा ‘सार्वमत शिलेदार’ पुरस्कार श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शिर्डीचे चेअरमन श्री. विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांना मिळाल्याबद्दल सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी, कर्मचारी हित, लोकसेवा, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि सभासदांच्या कल्याणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. या सन्मानामुळे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीसह शिर्डी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. विठ्ठलराव पवार पाटील यांनी सोसायटीच्या माध्यमातून सभासद, कर्मचारी वर्ग आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. पारदर्शक कारभार, विश्वासार्ह सेवा आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्यांची सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यसंस्कृतीचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
श्री. विठ्ठल तुकाराम पवार पाटील यांना ‘सार्वमत शिलेदार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोसायटीच्या संचालक मंडळासह कर्मचारी वर्गाने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील सेवाभावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

