shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या रिजन चेअरपर्सनपदी ॲड. डॉ. संदीप (भाऊ) गोंदकर यांची निवड

शिर्डी, प्रतिनिधी : शिर्डी शहरातील मितभाषी, सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित, युवा व संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ॲड. डॉ. संदीप (भाऊ) एकनाथराव गोंदकर यांची लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या रिजन चेअरपर्सनपदी निवड झाल्याने शिर्डीसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


रिजन चेअरपर्सन म्हणून त्यांच्या अखत्यारीत कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहाता सह्याद्री, श्रीरामपूर, संगमनेर सिटी, संगमनेर सफायर, संगमनेर, अहमदनगर आदी लायन्स क्लबचा समावेश असून, या सर्व क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे समन्वयन व नेतृत्व करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, प्रभावी संघटनकौशल्य आणि सेवाभावी वृत्ती यामुळे ॲड. डॉ. संदीप (भाऊ) गोंदकर यांनी अल्पावधीतच सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे लायन्स क्लबच्या सेवाकार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक गिरीशजी मालपाणी आणि ॲड. डॉ. संदीप (भाऊ) गोंदकर यांच्या नेतृत्वाची यशस्वी सांगड पाहण्याची संधी मिळणार असून, या जोडीच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल नानासाहेब शिंदे मित्र परिवाराच्या वतीने ॲड. डॉ. संदीप (भाऊ) गोंदकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

०००

close