26 वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली सव्वाशेवस्ती येथील अंगणवाडी अखेर झाली मंजूर.
पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील व महिला व बालकल्याण समिती सभापती अंकिता पाटील - ठाकरे यांच्या प्रयत्नांनी झाली मंजूर.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील सव्वाशेवस्ती परिसरातील गेली 26 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या मागणीला मंजुरी मिळाली असून पंचायत समिती सदस्या धनश्री किरण पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले .
सव्वाशेवस्ती परिसरातील चिमुकल्यांसाठी त्यांची गरज लक्षात घेऊन अंगणवाडीची मागणी धनश्री पाटील यांनी सातत्याने प्रशासनाकडे लावून धरली या मंजुरीसाठी पुणे जिल्हा परिषद पुणे च्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील - ठाकरे यांनीही विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे ही या मागणीला गती मिळाली. अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यानंतर सव्वाशेवस्तीवरील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण पोषण आहार आणि बाल विकासाच्या सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत .लहान मुलांना दूरवर जाण्याची गरज राहणार नसून पालकांची गैरसोय दूर होणार आहे . 26 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने या परिसरातील पालक व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अंगणवाडी मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील व जिल्हा परिषद पुणे सभापती अंकिता पाटील - ठाकरे यांचे आभार मानले.

