shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"सह्याद्रीच्या आक्रोशाने, जागा हो रे माणसा!” 🌳


सह्याद्री रडतोय, ऐका रे पुकार, झाडेच संपली तर, कसा जगणार संसार? कुऱ्हाड थांबवा रे, निसर्गाचा मान राखा, भीमाशंकर वाचवा, पृथ्वीचा श्वास राखा!

झाडांच्या कुशीत जन्मला, माणसाचा श्वास, वृक्षतोड केली तर, उरणार नाही आस! पक्ष्यांची घरटी तुटती, वन्यजीवांचा टाहो, सह्याद्रीच्या काळजात, घुमतो दुःखाचा आक्रोश!

पैशांसाठी जंगल तोडून, कोणता विकास साधणार? हिरवे डोंगर उजाड करून, उद्या कुठे जगणार? आजच जागे व्हा सरकार, निसर्गाचा सन्मान करा, भावी पिढ्यांच्या भविष्याला, हिरव्या वनांचे दान करा!

झाडे वाचवा, श्वास वाचवा, हाच जीवनाचा ध्यास, सह्याद्री वाचला तरच, टिकेल धरतीचा श्वास! निसर्ग संपला तर संपेल, मानवी जीवनाचा आधार, वृक्षतोड थांबवा सरकार, हाच जनतेचा हुंकार! 🌿

प्रस्तुती: शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम,अहिल्यानगर 
गितकार:रमेश जेठे सर,जिल्हा अहिल्यानगर
close