shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१३ वर्षीय नीरजच्या जीवनासाठी माणुसकीचा हात पुढे करा!

गंभीर यकृत विकाराशी झुंज; लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची गरज; दानशूर व्यक्तींना भावनिक आवाहन!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | विशेष प्रतिनिधी

शिर्डी (महाराष्ट्र) : ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शाळेत जायचे आणि भविष्याची सुंदर स्वप्ने रंगवायची, त्याच अवघ्या १३ वर्षांच्या वयात नीरज शशिराम कुर्हाडे या चिमुकल्यावर गंभीर आजाराशी झुंज देण्याची वेळ आली आहे. नीरजचे यकृत (लिव्हर) गंभीररीत्या खराब झाले असून, त्याच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात यकृत प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता असल्याचे कुटुंबीयांनी मदतीसाठी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात म्हटले आहे.


या उपचारासाठी योग्य यकृतदात्याची आवश्यकता असून, प्रत्यारोपण व पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नीरजच्या कुटुंबीयांनी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि संवेदनशील नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

एका चिमुकल्याच्या आयुष्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज!

माणुसकी ही केवळ शब्दांतून नव्हे, तर संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने सिद्ध होते. नीरजच्या उपचारासाठी प्रत्येकाने आपल्या परीने केलेली छोटीशी आर्थिक मदतदेखील त्याच्या कुटुंबाला मोठा आधार देऊ शकते.

नीरजच्या यकृत प्रत्यारोपणासाठी इच्छुक दात्यांनी पुढे यावे. यकृतदानासाठी आवश्यक वैद्यकीय पात्रता प्रत्यारोपण केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर निश्चित करतील.

तसेच आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी कुटुंबीयांनी फोन-पे क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. नीरजचे वैद्यकीय अहवाल आणि उपचारासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोडदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मदतीसाठी संपर्क : ९६८९२९५७०१ / ८६०५२११९६६

आर्थिक मदत करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे व देयकाची माहिती पडताळून घ्यावी.

तुमची छोटीशी मदत नीरजच्या उद्याच्या आयुष्याचा मोठा आधार ठरू शकते!

समाजातील दानशूर हात पुढे आले, तर या चिमुकल्याच्या उपचारासाठी कुटुंबीयांना मोठे बळ मिळू शकते. नीरजच्या जीवनासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना माणुसकीची साथ मिळावी, हीच अपेक्षा!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्हच्या माध्यमातून समाजातील दानशूर नागरिकांना नीरजच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन!

close