नवरात्रोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; शेतकरी हितासाठी प्रयत्नशील असल्याबद्दल आमदारांचे मानले आभार
वरूड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
संत्रानगरी वरूड शहरातील पी. डी. कन्या शाळेमागील परिसरात असलेल्या सप्तशृंगी दुर्गा मंडळाच्या वतीने लोकनेते आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर आणि वरूड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ईश्वर शिवकुमारजी सलामे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आमदार यावलकर यांनी मंडळाला भेट देऊन श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी परिसरातील महिला मंडळ, नागरिक आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सप्तशृंगी दुर्गा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोंधळ, भव्य रांगोळी स्पर्धा, आनंद बाजार, भक्तिगीत स्पर्धा, संगीत खुर्ची आणि हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगरसेवक तथा भाजप गटनेते किरण सावरकर, नगरसेविका सौ. सीमा हरिश कानुगो, माजी उपाध्यक्ष हरिश कानुगो तसेच नगरसेवक प्रविण सावरकर यांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी मंडळाला भेट दिल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष प्रफल्ल भोडेकर अनिल मांगलकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तसेच नगराध्यक्ष ईश्वर शिवकुमारजी सलामे यांचा पंकज अनासाने रंजित माकोडे व मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी वरूड नगर परिषदेचे नगरसेवक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडळाने आयोजित केलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आमदार यावलकर यांनी कौतुक केले. अशा उत्सवांच्या माध्यमातून नागरिक एकत्र येतात, धार्मिक परंपरांचे जतन होते आणि सामाजिक एकोपा वाढतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शेतकरी हितासाठी प्रयत्न केल्याबद्दल मानले आभार
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल सप्तशृंगी दुर्गा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांचे विशेष आभार मानले. मुख्यमंत्री महोदयांकडून शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या प्रयत्नांबद्दलही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले. उत्सवाच्या माध्यमातून भक्ती, सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देत सप्तशृंगी दुर्गा मंडळाने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला. या वेळी मंडळाचे पदाधिकारी प्रफुल्ल भोडेकर रंजित माकोडे अमोल आकोटकर भूषण खेरडे अभिजित राऊत पंवन मानकर प्रशांत घाटोळे सतिश काळे संदिप माकोडे प्रविण सावरकर पत्रकार कृष्णा वानखडे भारत श्रीराव नंदन खेरडे रवि माकोडे चंद्रकांत घाटोळे प्रविण वरखेडकर प्रमोद काळे कृष्णा सावरकर रामकिसन खेरडे यांची उपस्थिती लाभली.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111

