shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राध्यापक उमर बागवान सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा श्रीरामपूरात उत्साहात संपन्न..!

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
अशोक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित खासदार गोविंदराव आदिक आर्ट्स ज्यूनियर कॉलेजमधील ज्येष्ठ प्राध्यापक उमर बागवान सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा नुकताच शहरातील काँग्रेस भवन याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ३० वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर प्रा. बागवान सर ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार गोविंदराव आदिक शिक्षण संस्था सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या हस्ते प्रा. उमर बागवान सर यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेच्या चेअरमन पुष्पालता गोविंदराव आदिक, प्रा. बबनराव आदिक, संस्थेचे सचिव अविनाशदादा आदिक, सहसचिव ॲड.जयंत चौधरी यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी हंसराज आदिक, पतसंस्थेचे चेअरमन विजय थोरात सर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विविध शाळा-कॉलेजचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अमानत पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन'हाजी याकूब बाबुलाल बागवान, हाजी जावेदभाई बागवान ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी फय्याज चांद भाई बागवान, पत्रकार हाजी शफीकभाई बागवान,ॲड. रफिक यासीन शेख (बाबा शेख) केंद्रप्रमुख शकील बागवान सर, इब्राहीम बागवान सर,तसेच महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी, श्रीरामपूर' सर्व सदस्य यांच्या वतीनेही प्रा.उमर बागवान सर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सलग ३० वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी बजावलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे उपस्थितांनी गौरवद्गार काढले.

*वृत्त विशेष सहयोग
इब्राहीम बागवान (सर)
श्रीरामपूर - 94208 02156

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close