मुंबई प्रतिनिधी :- शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मिडिया राज्य प्रमुख संजय कुसळकर यांचा दि ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता मात्र पुर्ण राज्यावर दुष्काळाची सावट पसरल्या मुळे व
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर यांनी आपल्या वाढदिवसाचा कोणताही अवाजवी खर्च न करता तो अत्यंत साधेपणाने वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे . वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पालघर जिल्ह्यातील वैती या गावी वृक्षारोपण करून लहान मुलांना मिठाई वाटप करून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्या मुळे कौतुकास्पद आणि आदर्श सामाजिक उपक्रम राबवला.
वाढदिवसाच्या या विधायक उपक्रमाला शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील, शिवसेना ओबीसी / व्हीजेएनटी चे पालघर जिल्हाप्रमुख सचिन धायगुडे, मनीषा सचिन धायगुडे .यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सध्याच्या गंभीर परिस्थितीमध्ये राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्सवी खर्च टाळून समाजाभिमुख कार्य करावे, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला. संजय कुसळकर यांच्या या पर्यावरणपूरक आणि संवेदनशील पावलाचे वैती गावच्या नागरिकांकडून आणि राजकीय वर्तुळातून विशेष कौतुक केले जात आहे.

