shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी शैक्षणिक संकुलात शारदीय नवरात्रोत्सव व महाभोंडला उत्साहात संपन्न२७०० विद्यार्थिनी व महिला पालकांचा सहभाग; ‘खेळ पैठणीचा’, दांडिया नृत्य आणि विविध स्पर्धांनी सोहळ्यात रंगत

श्री शिवाजी शैक्षणिक संकुलात शारदीय नवरात्रोत्सव व महाभोंडला उत्साहात संपन्न

२७०० विद्यार्थिनी व महिला पालकांचा सहभाग; ‘खेळ पैठणीचा’, दांडिया नृत्य आणि विविध स्पर्धांनी सोहळ्यात रंगत
इंदापूर : श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदीय नवरात्रोत्सव व महाभोंडला सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सुमारे २७०० विद्यार्थिनी व महिला पालक सहभागी झाल्या. विविध मनोरंजक स्पर्धा, दांडिया नृत्य आणि ‘खेळ पैठणीचा’ या उपक्रमांनी सोहळ्याला रंगत आणली.
महिला सक्षमीकरण, भारतीय संस्कृतीचे जतन, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना व मार्गदर्शन संस्थेचे सचिव उदयसिंह पाटील यांनी केले.
या सोहळ्यास नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. अंकिताताई पाटील-ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी सौ. तेजश्री उदयसिंह पाटील, सौ. मृणाल मनोज पाटील, सौ. धनश्री किरण पाटील, सौ. चित्राताई कोरटकर, पंचायत समिती सदस्या धनश्री पाटील आणि बावड्याच्या सरपंच सौ. पल्लवीताई गिरमे यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिला पदाधिकारी व माता पालक उपस्थित होत्या.

कार्यक्रमानिमित्त शैक्षणिक संकुलात आकर्षक सजावट करण्यात आली होती. होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा, संगीत खुर्ची, बुक बॅलन्स, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, दांडिया नृत्य आणि महाभोंडला अशा उपक्रमांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पैठणी, साड्या, पर्स, कॉस्मेटिक सेट आणि अन्य आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुराधा देवकर यांनी केले, तर खेळ पैठणीचा व मनोरंजक स्पर्धांचे निवेदन कुमार शिंदे आणि रविराज बिबे यांनी केले. त्यांच्या खुमासदार निवेदनामुळे कार्यक्रमात आनंदी वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव उदयसिंह पाटील, माजी सचिव किरण पाटील व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले.

प्राचार्य डी. आर. घोगरे ,
महाविद्यालयाचे प्राचार्य लहू वावरे, कृषी चे प्राचार्य विराज मोहिते, प्राथमिकचे मुख्याध्यापक विनायक गुरव, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस डी घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संकुलातील सर्व विभागांचे प्रमुख ,उपप्राचार्य आर. बी. लोहकरे, पर्यवेक्षक एस. व्ही. कदम व पी. ए. घोगरे, सांस्कृतिक विभागप्रमुख शब्बीर मुलानी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना सौ आरती जगताप तर त्यास अनुमोदन सूर्यवंशी मॅडम यांनी दिले.प्रास्ताविक सो माने व्ही यु यांनी केले तर सूत्रसंचालन अनुराधा देवकर व व सौ दिपाली गडदे यांनी केले. तर सौ. एस. डी. घोगरे यांनी उपस्थित मान्यवर, महिला पालक, विद्यार्थिनी व सहकाऱ्यांचे आभार मानले.


महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपणारा हा महाभोंडला सोहळा उत्साहात पार पडला.
-------------
फोटो ओळ: श्री शिवाजी शैक्षणिक संकुल बावडा येथे नीरा-भीमा  कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री  पाटील ,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ. अंकिता पाटील-ठाकरे यांच्या उपस्थितीत 
शारदीय नवरात्रोत्सव व महाभोंडला सोहळा उत्साहात संपन्न झाला
close