shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौसे आजम सेवाभावी संस्थेचा बेलापूरमध्ये मोफत कॅम्प संपन्न

178 नागरीकांचे MHA ID कार्ड
तर 46 शेतकरी प्रमाणपत्रांचे काम

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
सेवा,न्याय,माणुसकी, संविधान या ब्रीदवाक्याखाली कार्यरत असलेल्या तालुक्यातील बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दि.16 ऑक्टोबर 2026 तालुक्यातील बेलापूर येथे मोफत MHA ID कार्ड व शेतकरी प्रमाणपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते, या कॅम्पला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कॅम्पमध्ये 178 नागरिकांचे MHA ID कार्ड तयार करण्यात आले, तर 46 शेतकरी प्रमाणपत्रांचे काम करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी मदत मिळावी, त्यांचा वेळ आणी पैसा वाचावा व शेतकरी बांधवांना आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सहकार्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड.नदीम सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाचे कामकाज नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.तसेच भाजपा अल्पसंख्याक उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मोहसीनभाई सय्यद यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक मुख्तार सय्यद, अध्यक्ष सुलतान शेख तसेच पदाधिकारी कैफ काझी, रेहान शेख, मुजम्मिल सय्यद आदी. यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन नागरिकांचे ID कार्ड व शेतकरी प्रमाणपत्रांच्या कामासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही समाजातील गरजू नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांसाठी असे जनहिताचे उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अजीजभाई शेख - राहाता 

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close