shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुष्काळाचे चटके, माळीवाड्यासह १० वस्त्यांना टँकरने पाणी द्या : शिवाजी आधाट

आमदार मोनिकाताई राजळे व नगरपरिषदेकडे साकडे; पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर

शेवगांव / प्रतिनिधी:
 कमी पाऊस आणि खालावलेली भूजलपातळी यामुळे शेवगांव शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. माळीवाडा, मगर वस्ती, नागरे वस्ती, गणेशनगर यांसह दहा भागांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनल्याने प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शेवगांव शहर सरचिटणीस शिवाजी आधाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार मोनिकाताई राजळे आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


यंदा कमी पाऊस झाल्याने शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांमधील विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाण्याची कसरत करावी लागत आहे. माळीवाडा, मगर वस्ती, नागरे वस्ती, गणेशनगर, आढाव वस्ती, बडवे वस्ती, शिंदे वस्ती, शिंगे वस्ती, शेंडे वस्ती आणि खुंटेफळ रोडवरील डाके मळा या भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे.
या परिसरात अनेक कुटुंबांकडे पशुधन असून, पिण्याच्या पाण्याअभावी जनावरांचेही हाल होत आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असताना जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हानही उभे राहिले आहे. त्यामुळे प्रशासनाने टंचाईग्रस्त भागांची तातडीने पाहणी करून परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे आणि प्रत्यक्ष टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
केवळ आश्वासनांवर वेळ न घालवता नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच पशुधनासाठीही पाण्याची उपलब्धता करून द्यावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस शिवाजी आधाट, खंडू भाऊ बुलबुले, नगरसेवक आशुतोष डहाळे, शाम डाके, दीपक नांगरे, रोहित नांगरे, सागर आधाट, शुभम नांगरे, रोहित भुजबळ, संदेश मगर, सचिन नांगरे, रवींद्र लिंगे, साईनाथ भुजबळ, देविदास लिंगे, अमोल नाईक, कार्तिक नांगरे, अनिकेत डाके, दत्तात्रय नांगरे, बाळासाहेब शित्रे, गणेश शिंदे, राहुल शित्रे, हरी नांगरे, विशाल आधट आणि कृष्णा नांगरे यांच्यासह अनेकांचे निवेदनावर सह्या आहेत.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार अलिम शेख - शेवगांव

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close