shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉक्टर शेख अरहम फारुक यांनी केले एम.एस.(ईएनटी) मध्ये यश संपादन !

अहिल्यानगर / प्रतिनिधी:
 जिद्द चिकाटी मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अहिल्यानगर शहरातील मेडिकल व्यवसाय करणाऱ्याचा मुलगा शेख अरहम फारूक याने वैद्यकीय क्षेत्रात एम.एस.(ई.एन. टी.) पदवीत्तर परीक्षेत यश संपादन केले. त्याने मिळविलेले प्राविण्य नगर शहरासाठी अभिमानाची बाब आहे.


       अरहम याने एमबीबीएस चे शिक्षण इंडियन इनस्टिट्युट ऑफ मेडिकल आणि रिसर्च सेन्टर बदनापुर जि. जालना येथून पूर्ण केले. तसेच मास्टर डिग्रीचे एम.एस. शिक्षण नागपूर येथील एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट आणि लता मंगेशकर हॉस्पिटल या वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले. या कामे त्यांना डॉं. काशीद गजानन नगर यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे आई व वडील यांनी त्यांना लहानपणा पासून विशिष्ट ध्येय पुढे ठेवले होते. डॉ.अरहम याने मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले. परीक्षा पास केल्यामुळे त्यांना अनेकांनी कौतुक व शुभेच्छा दिल्या.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान 
अ.नगर - 9860477869

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111


close