shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दीपोत्सव; मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप!दिवाळीनिमित्त १२ नोव्हेंबरला सामाजिक उपक्रमासह ‘आशा के रंग’ हा विशेष संगीत कार्यक्रम; ज्येष्ठ गायिका स्व. आशा भोसले यांच्या सुरेल गीतांची मेजवानी

 इंदापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दीपोत्सव; मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप!

दिवाळीनिमित्त १२ नोव्हेंबरला सामाजिक उपक्रमासह ‘आशा के रंग’ हा विशेष संगीत कार्यक्रम; ज्येष्ठ गायिका स्व. आशा भोसले यांच्या सुरेल गीतांची मेजवानी
**इंदापूर : प्रतिनिधी**

सामाजिक ऐक्य, बंधुभाव, सर्वधर्मसमभाव आणि परस्पर प्रेमाचा संदेश देत इंदापूर शहरात एक अनोखा दिवाळी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांना प्रेमपूर्वक दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येणार असून, या उपक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडणार आहे.

गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता नगरपालिकेजवळील प्राथमिक मुलांची शाळा क्रमांक १ व २ येथे हा दिवाळी स्नेहमेळावा होणार आहे. प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध गायिका स्वर्गीय आशा भोसले यांच्या अजरामर गीतांना समर्पित ‘आशा के रंग’ हा विशेष संगीत कार्यक्रम. सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुसक (पुणे) यांच्या सादरीकरणातून आशाताईंच्या गाजलेल्या गीतांची सुरेल मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे. किशोर कुमार यांचा आवाज लाभलेल्या या गायकाच्या सादरीकरणामुळे संगीतप्रेमींना जुन्या अजरामर गीतांचा आनंद घेता येणार आहे.

दिवाळी हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. या सणाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांसाठी फराळाचे आयोजन करणे हा सामाजिक सलोखा दृढ करणारा स्तुत्य उपक्रम आहे. धर्म वेगळे असले तरी माणुसकी, प्रेम आणि बंधुभाव हीच समाजाला जोडणारी खरी ताकद आहे, हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

इंदापूर शहरातील सर्व नागरिक, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमींनी सहकुटुंब व सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्नेहमेळाव्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
close