shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

नव स्वराज्य सेनेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन

श्रीरामपूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नव स्वराज्य सेनेच्या वतीने आझाद मैदान येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित, बहुजन आणि उपेक्षित घटकांच्या उद्धारासाठी समर्पित केले. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन आणि शिक्षणाचा प्रसार यासाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजाला दिशा देणारे आहे. समाजातील अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमतेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आजही प्रत्येकाने प्रेरणादायी मानून पुढे नेण्याची गरज आहे. महात्मा फुले यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.
      या कार्यक्रमास रवींद्र गोविंदराव काळे, कारभारी बाबूराव जाधव, सुभाष मोरे, नंदकिशोर बैरागी, कुशाबा शेळके, राजेंद्र भागवत, दादू खंडागळे मास्तर ,बबन जाधव, किरण अंगरखे, महिंद्र दिवसेने, अमोल कुसळकर, अनिल वडीतके यांच्यासह नव स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
close