shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

संविधानाचा जागर, लोकशाहीचा सन्मान! एल. जी. बनसुडे इंग्लिश मेडीयम स्कुल & जुनिअर कॉलेज पळसदेव मध्ये विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा*

*संविधानाचा जागर, लोकशाहीचा सन्मान! एल. जी. बनसुडे इंग्लिश मेडीयम स्कुल & जुनिअर कॉलेज पळसदेव मध्ये विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा* 
पळसदेव (ता. इंदापूर) : येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे इंग्लिश मेडीयम स्कूल & जुनियर कॉलेज पळसदेव २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परिपाठापासून करण्यात आली. यावेळी सहशिक्षिका सौ.चैताली जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. सौ.लता खारतोडे व सौ.स्नेहल गायकवाड यांनी आकर्षक फलक लेखनातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व त्यातील मूलभूत मूल्यांचा संदेश दिला. तसेच सौ.सोजर काळे यांनी संविधान दिनानिमित्त सुंदर रांगोळी रेखाटली.
यानिमित्ताने विद्यालयातर्फे भव्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. नर्सरीपासून इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध घोषणांद्वारे ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी पोस्टर मेकिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.हनुमंत बनसुडे(नाना ), कार्याध्याक्ष्या सौ नंदाताई(नानी) बनसुडे, सचिव श्री.सूरज बनसुडे, कॅम्पस समन्वयक श्री.राजकुमार भोसले, समन्वयक सौ.तेजस्विनी तनपुरे, मुख्याध्यापिका सौ.सीमा बाराते, उपमुख्याध्यापिका सौ.सुवर्णा वाघमोडे, विभागप्रमुख श्री.प्रवीण मदने, सौ.ज्योती मारकड, सौ.तनुजा फुगे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कॅम्पस समन्वयक ऍड.राजकुमार भोसले यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.सीमा बाराते व उपमुख्याध्यापिका सौ.सुवर्णा वाघमोडे यांनी केले.
विभागप्रमुख सौ.ज्योती मारकड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. संविधान हा केवळ नियमांचा दस्तऐवज नसून प्रत्येक नागरिकाला जबाबदारीची जाणीव करून देणारा मार्गदर्शक आहे, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रकाश दरदरे यांनी केले. यावेळी विद्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे पालन करून जबाबदार, कर्तव्यदक्ष व सक्षम नागरिक बनण्याचा सामूहिक संकल्प केला.
संविधानातील मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांनी विद्यालयातील संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
close