shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
 इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील मूल्ये आणि लोकशाही तत्त्वांप्रती कटिबद्धता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात प्राध्यापिका ज्योत्स्ना गायकवाड यांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले. उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान व भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. संविधान हा केवळ देशाचा सर्वोच्च कायदा नसून भारतीय लोकशाहीचा भक्कम आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधानातील मूलभूत हक्कांसोबतच नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे आवश्यक असून, संविधानाने दिलेल्या मूल्यांचे आचरण दैनंदिन जीवनात करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे,डॉ.विजय केसकर,डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विलास बुवा,कार्यालय अधीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
close