shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्काराने गौरव कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान; शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्काराने गौरव

कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान; शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल
इंदापूर : इंदापूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचा ‘आदर्श शिक्षण संस्था’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते इंदापूर येथे संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान ही संस्था सन १९८० पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, माध्यमिक विद्यालय तावशी आणि माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी या शैक्षणिक संकुलांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेने दिलेले योगदान,शैक्षणिक संस्थांचा विस्तार आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, मयूरसिंह पाटील,इंदापूर संचार चे संपादक सागर शिंदे, सहसंपादिका मोहिनी भोसले-शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नगरसेवक उपस्थित होते.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेस आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार मिळाल्याने संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार वीरबाला पाटील,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग यांनी समाधान व्यक्त केले.
close