shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श विद्या मंदिरात ९०० विद्यार्थ्यांच्या हातून साकारले आकर्षक आकाशकंदील!

दिवाळीनिमित्त भव्य आकाशकंदील स्पर्धा; टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ निर्मितीचा संदेश

प्रतिनिधी : मोहन शेगर 
सोनई : दिवाळी सणाचे औचित्य साधून सोनई येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेत सोमवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य आकाशकंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील तब्बल ९०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव देत विविध रंगांचे, आकारांचे आणि आकर्षक सजावटीचे आकाशकंदील स्वतःच्या हातांनी तयार केले होते. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा अभिनव प्रयोग केला. प्लास्टिकविरहित आकाशकंदिलांची संख्या लक्षणीय असल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. स्वतः तयार केलेले आकाशकंदील दिवाळीत घरी लावण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
या स्पर्धेत एलकेजी ते चौथीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातून स्वतंत्रपणे प्रथम पाच क्रमांकांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई रविराज गडाख व संस्थेचे सचिव श्री. रविराज तुकाराम गडाख उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. सायली लिपाने, डॉ. शुभांगी घावटे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. क्षितिजा इंगळे, पत्रकार सौ. अनिता खंडागळे, सौ. नंदिनी कुसळकर आणि युनियन बँकेच्या कर्मचारी सौ. अनिता शिंदे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे परीक्षण करून चिमुकल्यांचे कौतुक केले.


या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री. दरंदले ए. बी. सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जाधव एम. बी. व गायवळ एस. बी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती बेल्हेकर एम. यू. यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम पालक व परिसरातून कौतुकाचा विषय ठरला.
close