*
सविस्तर बातमी: नळदुर्ग पोलीस स्टेशन च्या हद्दीत फुलवाडी टोल नाक्या जवळ पकडण्यात आलेल्या 102 किलो गांजा प्रकरणातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय कडून जामीन मंजूर दिनांक 26/04/2022 रोजी नळदुर्ग ता तुळजापूर येथील नळदुर्ग - सोलापूर रोड वरील फुलवाडी टोल प्लाझा टोल नाक्याजवळ नळदुर्ग पोलिसांनी हुंडाई असेन्ट कार मधून जवळपास १०२ किलो गांजा अंदाजे रक्कम रुपये १५ लाख ४३ हजार ७२५ रुपयांचा गांजा आरोपीच्या गाडीतुन जप्त केलेला होता सदर प्रकरणात नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक १३०/२०२२ हा नार्कोटिक ड्रग्स सायको ट्रोफिक सबस्टन्स अॅक्ट अन्वये कलम 20 (b) नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला होता
सदर प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास करून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद स्पेशल कोर्ट येथे आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर आरोपी ने ॲड विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे यांच्यामार्फत माननीय जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर केलेला होता सदर जामीन अर्जावर प्रकरणात विविध मुद्द्यावरती व तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या न्याय निर्णयाचे दाखले सादर करण्यात आले व युक्तिवाद सादर केला..अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी आरोपीच्या वतीने सादर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद स्पेशल कोर्ट यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
सदर प्रकरणात अॅड विक्रांत वाघचौरे मोबाईल नंबर ८४४६७३६०२१ यांनी काम पाहिले, सदरील कामात मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरातील वकील व नागरिकांकडून शुभेच्छा व कौतुक होत आहे.

