shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परदेशी नागरीकांच्या वास्तव्याची माहिती देण्याचे तहसीलदारांचे आदेश



शिर्डी प्रतिनिधी:

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये आदेश पारित केले असून त्याची जिल्हात अंमलबजावणी करण्यात येत आहे.



            राहाता आणि  शिर्डी परिसरातील हॉटेल, लॉज, धर्मशाळा तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात परदेशी नागरीक अथवा परदेशातून आलेल्या व्यक्ती यांनी वास्तव्य केले असल्यास अथवा वास्तव्य करीत असल्यास, त्यासंबधीची माहिती संबधितांनी त्वरीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे. परदेशी नागरीकांच्या राहाता आणि शिर्डी परीसरातील वास्तव्याची माहिती दडवल्यास अथवा निदर्शनास आल्यास संबधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे राहाता तहसीलदार यांनी कळविले आहे.

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com


संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५


close