shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संचारबंदीचे नियम तोडणा-या 70 जणांवर विशेष पथकाने केली कारवाई..!!

सावळीविहीर । राजकुमार गडकरी।
       सध्या कोरोना पार्श्वभूमीवर  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे,मात्र लॉकडाऊन चे नियम व संचारबंदी चे नियम शिर्डीत अनेक व्यक्तींकडून मोडले जात असून त्यामुळे शिर्डीत आज  सकाळी सहा वाजता  मॉर्निंग वॉकला निघालेल्या  एकूण 70 जणांवर विशेष पथकामार्फत  दंडात्मक कारवाई करण्यात आली.सध्या सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे.
देशभर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. सर्वजण लॉकडाऊन व संचारबंदी चे नियम पाळत असुन सर्वजण आपापल्या घरात आहेत, मात्र शिर्डीत काहीजण सकाळी  मॉर्निंग वॉकच्या कारणाने बाहेर पडतात व विनाकारण मोटरसायकलवर बाहेर फिरत असतात,काही विनाकारण हॉस्पिटल,भाजीपाला दुकान, किराणा, मेडिकल मध्ये जाण्याचे कारण सांगून नाहक फिरत असतात.




       अशांवर कारवाई होणे महत्त्वाचे असल्याकारणाने अशा नियम मोडणाऱ्या लोकांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशन व नगरपंचायतने मिळून कारवाई करण्यासाठी स्वतंत्र एक पथक तयार करून  अशा लोकांवर कारवाई करण्यात येत आहे.

      आज गुरुवारी सकाळी सहा वाजता शिर्डी चे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले व त्यांची टीम तसेच नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे पथक येथील द्वारावती सर्कल येथे तैनात करण्यात आली होती. सकाळी शिर्डीतील सुमारे 70 जण हे लॉक डाऊन चे नियम मोडून मॉर्निंग वॉकला जात असताना या पथकाने त्यांना आडवून त्याच ठिकाणी सुमारे दीड तास शिक्षा म्हणून व्यायाम करण्यास भाग पाडले.तसेच काही व्यक्तींकडून प्रत्येकी दोनशे रुपये तर काही व्यक्तींकडून प्रत्येकी पाचशे रुपये असा दंड वसूल करण्यात आला. 

        या 70 जणांमध्ये दहा महिलाही होत्या, या सर्वांवर  नियम मोडल्यामुळे ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच सकाळीच शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या 10 मोटरसायकल स्वारांच्या मोटारसायकली जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.



      शिर्डीत सध्या कडक अंमलबजावणी सुरू असून कोणीही लॉक डाऊन व संचारबंदी चे नियम मोडू नये, आपल्या घरात राहावे ,तोंडाला मास्क लावावे, असे आवाहनही शिर्डी पोलिसांनी केले आहे, जर लॉक डाऊन व संचारबंदी चे नियम कुणीही मोडले तर त्यांच्यावर कडक कारवाई यापुढेही करण्यात येईल.त्यामुळे प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. अन्यथा दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल. असा इशाराही शिर्डी पोलिसांनी दिला आहे.
close