देवळाली प्रवरा:
पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी असी मागणी देवळाली प्रवरा येथील शेतकरी तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे दि. 7 मे 2020 रोजी सायं 06.00 वा. ई मेल द्वारा पाठविलेल्या पत्रात केली आहे.
निवेदनात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले आहे की, केंद्र शासनाचे वतीने राज्यातील शेतकर्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकर्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत.
या सहा हजार रुपयांचे तिन हप्त्यात वर्गीकरण करुन दोन हजार रुपये प्रमाणे वर्षातील प्रत्येक चार महिन्याने शेतकार्यांना ही रक्कम टप्या टप्याने अदा होणे अपेक्षीत आहे. तथापी शासकीय यंत्रना व बँका यांचेकडे असलेल्या शेतकार्यांच्या नावाच्या यादीतील किरकोळ बदल किंवा चुकांमुळे अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकरी या योजनेतील रक्कमेपासून आजही वंचित आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी जेंव्हा शासनाच्या पी.एम.किसान या पोर्टलवर आपले दोन हजार रुपये वर्ग झाले की नाही याची माहीती घेतात, तेंव्हा त्यांना Payment stopped by state (म्हणजे राज्याने पेमेंट थांबविले आहे) असे त्यांच्या स्टेटस मध्ये माहीती दिसते. त्यामूळे केंद्र सरकारने रक्कम पाठविली आहे, परंतू राज्य सरकारने ती अडवून ठेवली आहे. असा चुकीचा संदेश राज्यातील शेतकर्यांमधे पसरत आहे. कोरोनामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला असुन आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामूळे त्यांना आज या रक्कमेची अत्यंत गरज आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून संबंधीत कार्यालयांनी शेतकर्यांच्या नावातील चुकिची दुरुस्ती करुन शासनाला शेतकर्यांच्या याद्या पाठविल्या आहेत, तरिही अहमदनगर जिल्ह्यातील लाखो शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासुन आजही वंचित आहेत. म्हणून अपणास नम्र विनंती की, पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम अहमदनगर जिल्ह्यातील व राज्यातील वंचित शेतकर्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग होणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करने कामी संबंधीत विभागाला योग्य ते आदेश द्यावेत असी विनंती ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात केली आहे.