वकील म्हटला की आपल्या डोळ्यासमोर पांढरा शर्ट व काळय़ाकोटात सुटाबुटात कोर्टात दिसणारा व्यक्ती. हा एक स्वतःचा प्रोफेशन असणारा आणि रोजच्या येणाऱ्या केसेसवर चालणारा कायदाचा अभ्यासक म्हणून मान्यताप्राप्त व्यवसाय गेली 50/55 दिवसापासून जवळजवळ बंदच झाला आहे. मला आमच्या काही वकील मित्रांनी संपर्क करून आपली व्यथा मांडली. खरोखरच त्यांची अशी दशा झाली आहे की, कुणालाही बोलता येत नाही. अवघड जागेचे दुखणे म्हणतात तसेच यांचे झाले आहे.
उल्हासनगर, कल्याण, आणि ठाणे या कोर्टमध्ये असणारी प्रत्येक ठिकाणी त्यांचे एक बार असोसिएशनचे पदाधिकारी असताना न घर काना घाट का अशी दयनीय अवस्था या वकिलांची झाली आहे. बार असोसिएशनचे सदस्य नोंदणी करतांना 25000/- फी घेतात आणि नंतर त्यांना कोर्टात काम करण्याची परवानगी देतात. यामध्ये काही वकील हे बाहेरून आपली वकिली करण्यासाठी आले आहेत. संपूर्ण परिवाराची जबाबदारी एकट्यावर असल्याने घरभाडे, किराणा, व मुलांचे शिक्षण आपल्या वकिलीत घराचा गाढा हाकत होते. आता 50 दिवसाच्या जास्त झाले,लॉकडाऊनमुळे कोणत्याच प्रकारचे केसेस न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
याबाबत वकिलांची व्यथा आमच्या नजरेतून आपल्यासमोर मांडावी यासाठी हा लेख प्रपंच.
वकील, डॉक्टर, आणि पत्रकार जरी वेगळे वाटत असले तरी ते ज्या सरकारी रथावर स्वार आहेत तो एकच आहे. यांना समाजात वेगळे स्थान आहे., मानसन्मान आहे. त्यामुळे त्यांना आपली व्यथा मांडता येत नाही. समाजात साहेब म्हणून वावरणारे आपली खरी व्यथा सांगितली तरी मजाक उडवणे हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. याच कारणाने मूग गिळून गप्प बसण्यात शहाणपण आहे असे समजून कुठेही वाच्यता न करता शांत बसणारा वकील. आता मर्यादा कुठेतरी संपते आणि शांतपणाचा उद्रेक होतो तसे आता झाले आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढतच चालला आहे. कोरोना संसर्ग व मृत्युचा दर वाढतच आहे अजून हे किती दिवस चालेल सांगता येत नाही. सरकार व देश सगळ्याचा विचार करून प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देत आहे. विमाचे संरक्षण देऊन परिवाराला सुरक्षित करत आहेत. पण वकील मात्र यातून अलिप्त आहे. वकिलाचा कोणीच वाली नाही अशी अवस्था झाली आहे. वकिली संघटना असून नसल्या सारखी दिसत आहे.
याबाबत सरकारने विचार करून वकील साहेबांची व्यथा समजून घ्यावी आणि अशा कठीण प्रसंगी वकीलसुध्दा एक माणूस आहे समाजाचा घटक आहे म्हणून मदतीचा हात द्यावा.
घरीच रहा ! सुरक्षित रहा ॥
सरकार आपली काळजी घेत आहे.
अरूण ठोंबरे
पत्रकार 9322107521/95271541112