shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजपा युवा मोर्चा कुळगांव बदलापुर शहराच्यावतीने “जय श्रीराम” लिहिलेली 2 हजार पत्रे पवारांना पाठविली..!!*

*भाजपा युवा मोर्चा कुळगांव बदलापुर शहराच्यावतीने “जय श्रीराम” लिहिलेली 2 हजार पत्रे पवारांना पाठविली*

*बदलापुरातशरद पवारांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध*

*बदलापुर । प्रतिनिधी*


भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल ह्यांनी केलेल्या आदेशानुसार सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी भाजपा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटिल तसेच मुरबाड आमदार किसन कथोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगांव बदलापुर शहर भारतीय जनता युवा मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक येथील भाजपा कार्यालयाजवळ जाहीर निषेध व्यक्त करीत “जय श्रीराम” लिहिलेले दोन हजार पत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या निवासी पत्त्यावर टपालव्दारे पाठविण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर "मंदिर बांधून कोरोना  आटोक्यात येणार नाही" या  रामनामावर केलेल्या वक्तव्याचा कुळगांव-बदलापुर शहर भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्येमाने गांधी चौक, कुळगांव कार्यालयाजवल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून 5 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर शरद पवारांनी श्रीराम नामाचे महत्व जाणावे, तमाम रामभक्तांच्या अपार भक्तीला पोहचलेली ठेच त्यांच्या लक्षात यावी व त्यांनी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर रामनामाचा जप करावा. यावेळी उपस्थित सर्व  कार्यकर्त्यानी जय श्रीराम, जय श्रीराम असा जयघोष करून  संपूर्ण बदलापुर शहरात  श्रीराममय वातावरण निर्माण केले होते.  

या आंदोलनात भाजपा युवा मोर्चा बदलापुर शहराध्यक्ष नयन जयवंत मुठे, सरचिटणीस तुषार प्रभुदेसाई , उपाध्यक्ष प्रफुल मोरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भोपी, वार्ड अध्यक्ष दिपक घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सदस्या सौ. प्रिया झोरे, युवती चिटणिस कु.ज्योती जावळेकर ह्यांच्यासह आदी कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित होते .
close