ॲड एस एस पाटील यांच्या निधनामुळे सहकार सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले
- अमित विलासराव देशमुख
लातूर ( प्रतिनिधी):
लातूर येथील सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन , सुप्रसिद्ध विधिज्ञ , जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निष्ठावान पदाधिकारी ॲड एस. एस. पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे सहकार, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
ॲड एस एस पाटील हे लातूर जिल्हा वकील मंडळातील एक ज्येष्ठ कायदेतज्ञ होते. लातूर जिल्हा काँग्रेस मध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही ते ओळखले जायचे. सहकार, शैक्षणिक राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. आदरणीय , विलासराव देशमुख साहेब यांचे ते सहकारी होते . त्यामुळे देशमुख कुटुंबियांशी त्यांचा कायम स्नेह होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे देशमुख कुटुंबियांना दुःख झाले आहे, . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

