shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने केला १६ हजारांचा टप्पा पार..!!

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाने केला १६ हजारांचा टप्पा पार..!!

 July 27, 2020
 पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. रविवारी शहरात नवीन ६५१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

शहरात रविवारी ६५१ जणांना कोरोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील ३२ जणांचे तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या १६,२८३ इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत शहरात ३७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील २९९ रुग्णांचाही समावेश आहे.

शहरात आजपर्यंत ३५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील २८४ व शहराबाहेरील ७५ रुग्णांचा समावेश आहे. रविवारी दिवसभरात ९ रुग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला. त्यामध्ये शहरातील ८ तर शहराबाहेरील एका रुग्णाचा बळी गेला. शहरातील वाकड, वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड, चिखली मोरवाडी येथील आठ जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील पाषाण येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवसभरात ७५३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १०९११ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ३३८७ संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ११९७ जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
close