पिंजरा पद्धतीच्या मच्छ व्यवसायाचे व संवर्धनाचे आमदार शिंदे व जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक..!!
लोहा (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील सुप्रसिद्ध एकमेव पिंजरा पद्धतीने मत्स्यव्यवसाय व संवर्धन प्रकल्प लिंबोटी जलाशया वर जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांनी राबवलेला आहे या प्रकल्पास काल रविवारी लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पाहणी केली ,यावेळी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त लहाने, तहसीलदार विठ्ठल परळीकर, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हाधिकारी यांचे चिरंजीव आयान ,सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बाधा वार ,मच्छ व्यवसाय विकास अधिकारी कोल्हे ,मच्छी व्यवसाय प्रशासकीय अधिकारी सोनटक्के उपस्थित होते .
काल रविवारी नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लिंबोटी धरणाच्या पाणी साठ्याची व पिंजरा पद्धतीच्या मच्छी पालनाची पाहणी आमदार शामसुंदर शिंदे व जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लिंबोटी धरनातील मच्छी पालनाची ही पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा आमदार शामसुंदर शिंदे, व जिल्हाधिकारी डॉ .विपीन केली ,यावेळी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हाधिकारी यांचे चिरंजीव आयान ,अभिजित पाटील कदम ,सुधाकर सातपुते , सचिन श्री सागर प्रसाद जाधव ,यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

