सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर )
माजी खासदार तुकाराम पा गडाख यांच्या मातोश्री कौसल्याबाई याचे शनिवारी रात्री वृध्दपकाळाने निधन
झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्ष.होते.
काल सकाळी ११वाजता पानसवाडी येथील अमरधाम येथे
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, मुली नात असा मोठा परीवार असुन माजी खासदार व
नेवासा शेवगाव मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम गडाख यांच्या मातोश्री होत्या. काल ना. शंकरराव गडाख व जि.प चे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी तुकाराम गडाख यांना भेटून त्यांचे सांत्वन केले तर अंत्यसंस्कारावेळी सोनई परीसरातून नातेवाईक व सर्वच क्षेत्रातील चाहते
उपस्थित होते.

