shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्वादिप लक्ष्मण पिंगळे यांची अहमदनगर जिल्हा भारतीय लहुजी सेना युवा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड..!!


शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव

भारतीय लहुजी सेनेचे सेना प्रमुख व्ही.जी रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते विश्वादिप पिंगळे यांची अहमदनगर जिल्हा युवा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली.

तसेच त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्य बघताच त्यांची अहमदनगर जिल्हा युवा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे असे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांना भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले तसेच त्यांना निवडीचे पत्र देतांना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल समवेत राष्ट्रीय सरचिटणीस रामभाऊ पिंगळे युवा जिल्हा प्रमुख भाऊसाहेब आव्हाड जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष समीर वीर सह आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच पिंगळे यांची निवड होताच राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण राज्य सल्लागार advocate रमेश कोळेकर राज्य प्रमुख सुरेश अडांगळे जिल्हा प्रमुख रजाक शेख आदी वरीष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे फोनद्वारे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
close