प्रकाश मुंडे । तालुका प्रतिनिधी केज :
केज व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अनंत रामभाऊ मिटकरी ( ६० ) यांचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सकाळी ६ वा अखेरचा श्वास घेतला .
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तसेच मनमिळाऊ व्यक्ती सर्व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी होणारे अनंत रामभाऊ मिटकरी यांचे २६ अॉगष्ट बुधवारी सकाळी ६ वा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात निधन झाले . अनंत मिटकरी यांना किडनीचा विकार होता तिन दिवसापुर्वी लातुर येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये अँडमिट केले होते तिथे डायलेसिस वर होते तेथून मंगळवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते रात्री उपचार चालू असताना सकाळी ६ वा त्यांची प्राणज्योत मालवली . सध्याच्या परिस्थितीत अंत्यसंस्कार औरंगाबाद येथेच करण्यात आले असल्यामुळे नातेवाईक यांनाही जाता आले नाही . त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे . अनंतराव मिटकरी यांच्या जाणान्ये केज शहरावर शोककळा पसरली आहे .

