प्रकाश मुंडे । तालुका प्रतिनिधी केज:
कैद्यांपेक्षाही निकृष्ट जेव पवारण अक्षय मुंदडा -- यांनी केली खंत व्यक्त ..!!
अंबेजोगाई येथे कोरोना रुग्णांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांनी आज अचानक कोरोना रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाची पाहणी केली यात उघड झाले आहे.
प्रशासनाकडून कोरोना रुग्णांसाठी दर्जेदार जेवणाचा चार्ट ठरवून दिला आहे.त्यात रुग्णांच्या दृष्टीने हेल्दी आणि पोषक आहार द्यावयाचा आहे. मात्र अंबेजोगाई येथील कोरोना रुग्णांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत असल्याची पोलखोल अक्षय मुंदडा यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक संतोष शिनगारे,लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहूळे,दिनेश भरडीया यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना रुग्णांना देण्यात येणारे जेवण अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे दुसऱ्यांदा समोर आले आहे. याची ओरड नेहमीच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
मागील आठवड्यामध्ये असाच प्रकार घडला असता त्याची चौकशी तहसीलदार यांच्यामार्फत केली. परंतु एवढ्या वरही काही फरक पडला नाही, पहिले पाढे पंचावन्न अशा पद्धतीने पुन्हा चहाला जेवणाला किंवा नाश्त्याला कुठल्याच वेळेचे बंधन नाही.
काहीच वेळेवर मिळत नसल्याची ओरड रुग्ण आणि नातेवाइकाकडून होत असल्याने आज दि २४ऑगस्ट रोजी आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांनी कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवनाची पाहणी केली त्यामध्ये ही बाब उघड झाली असून एक वेळ कैद्यांना तरी दर्जेदार जेवण मिळत असेल परंतु या रुग्णांना त्याहीपेक्षा निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची खंत अक्षय मुंदडा यांनी पाहणी दरम्यान व्यक्त केलीय.यावेळी नायब तहसीलदार गणेश सरोदे, नायब तहसीलदार वाघ मॅडम यांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

