गडचिरोली ता.७ :- जिल्ह्यात १७ सुरक्षा जवानांसह इतर ६ नागरिकांचा कोरोनाचा अहवाल शुक्रवारी पाॅझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६९४ एवढी झाली आहे.
नव्याने आढळलेल्या बाधितांनमध्ये देसाईगंज तालुक्यातील सीआरपीएफ बटालियनच्या १२ जवानांचा समावेश आहे. हे जवान काही कामानिमित्त पुणे येथे शासकीय वाहनाने गेले होते.आल्यानंतर सर्वांना विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या मध्ये सर्वांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच अहेरी येथील सीआरपीएफ बटालियनचे दोन जवान गुरगाव येथे गेल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा रहिवासी पत्ता अहेरी येथील असल्यामुळे त्यांची कोरोना नोंद जिल्हयात करण्यात आली आहे. त्या दोघांवर गुरगाव येथे उपचार सुरू आहेत.
धानोरा पोलिस स्टेशनमधील तीन जवान, अशा एकूण १७ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील चार , रंगधामपेठा व भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक नागरिक आढळून आला आहे.. यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९४ झाली आहे. आतापर्यंत ५१० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्या १८३ सक्रिय रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

