मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे ..
काही लोक तर्कावर जगतात आणि काही लोकांना जीवन व्यतीत करण्यासाठीं श्रद्धेची गरज वाटतें .. ज्यांना श्रद्धा गरजेची वाटते त्यांच्या श्रद्धेला कमी लेखण्याची गरज कोणाला का भासावी ?विशेषतः जिथे तर्क मागितला तर तर्कसुद्धा दिला जात नाही किंवा ज्यांना देता येत नाही आणि इतरांच्या श्रद्धेचा उपहास करून केवळ बालहट्ट म्हणून ' मंदिर नकोच ' ही मागणी केली जाते अशा ठिकाणी हा प्रश्न अधिक उचित आहे.
ज्याप्रमाणे बागा , खेळांची मैदानं , ग्रंथालयं , किल्ले , amusement parks , trekks , कलामंदिर , नाट्यगृह , सिनेमागृह ही माणसाच्या जडणघडणीचा एक भाग असतात त्याचप्रमाणे श्रद्धास्थान म्हणून मंदिरंसुद्धा त्या जडणघडणीचा एक भाग असतात ..माणूस केवळ पैशावर आणि ज्ञानावर जगू शकत नाही ..भावना, श्रद्धा , भक्ती , प्रेम , सहजीवन ह्या आणि अशा अनेक अमूर्त (intangible) गरजा माणसाला जगण्यासाठी आवश्यक असतात . पंढरीच्या वारीत एखाद्या तासासाठी जरी फेरफटका मारला की मन ओथंबून जातं आणि नकळत आनंदाश्रू डोळ्यात उभे राहतात, जो आनंद आणि समाधान तिथे अनुभवायला मिळतं ,त्यातून मनावरची जळमटं निघून जातात आणि मनाला उभारी येते.
ॐकारेश्वराच्या मंदिरात डोळे मिटून दहा मिनिटं जरी बसलं तर जी शांतता आणि प्रसन्नता जाणवते किंवा घंटानाद ऐकून एखाद्या देवळातल्या आरतीनी जे 'बरं वाटणं' असतं ती श्रद्धा असते .. लोकांना माहीत असतं की आपल्यालाच कृती करावी लागणार आहेत ..कष्ट घ्यावे लागणार आहे . देव येऊन ते करणार नाही .. पण 'माझा पांडुरंग आहे माझ्या पाठीशी ' , 'देवा, तूच बघ रे बाबा ' म्हणत कठीण प्रसंगी जगण्याची धडपड करणारे लोक जो विश्वास आणि दहा हत्तींचं बळ अनुभवतात तो विश्वास कोणताच motivational speaker किंवा counsellor देवू शकत नाही ..
आणि बऱ्याच लोकांना असल्या services परवडत पण नाहीत .. देवळात हरिपाठ ऐकण्यात जर कोणाला आनंद मिळत असेल आणि वैयक्तिक जीवनात पडलेल्या प्रश्र्नांची उत्तरं मिळत असतील तर त्या आनंदात खोडा घातलाच पाहिजे का ? हॉस्पिटल ज्याप्रमाणे आजारी माणसाला ठीक करण्यासाठी असते त्याचप्रमाणे श्रद्धा ही माणसाला प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यासाठी काम करत असेल तर त्याला विरोध कशासाठी ? ग्रंथालयं जर ज्ञानाची आणि बुध्दीची भूक भागवत असतील तर मंदिरं मनाची आणि बुद्धीची तहान भागवतात आणि कित्येक मंदिरं भुकेल्यांच्या पोटाची पण भूक भागवतात .
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला right to religion अाहे ..आणि तो तर मुलभूत मानवाधिकार आहे .. जिथे right to religion हा Universal declaration of Human Rights मध्ये मूलभूत मानवाधिकार असतो तेव्हा श्रद्धा ही एक गरज म्हणून अधोरेखित होतेच शिवाय मानवाधिकार बनते . त्या right to religion ला आचरणात आणण्याचं काम मंदिरं करतात. कोरोना सारख्या काळात मंदिरांनी करोडो रूपये दानासाठी दिले . दगडुशेठ हलवाई , शेगाव , अक्षरधाम , इस्कॉन , इशा योगा ध्यांनलिंग मंदिर , सिद्धिविनायक अशी किती नावं आहेत जिथे रोज हजारो नागरिक रोज विनामूल्य जेवतात किंवा जे सामाजिक कार्याला करोडो रुपये देतात , शाळा चालवतात , वृद्धाश्रमात मदत करतात , शिक्षण साहित्य वाटतात. किती ग्रंथालयांनी किंवा हाॉस्पिटलनी हे केलं ?
मी ग्रंथालयांच्या विरोधात मुळीच नाही पण जर कोणाला तुलना करायचीच असेल तर ह्याचं पण उत्तर द्यावं लागेल; आणि हाे !
मंदिरं पुस्तकांसाठी पण देणग्या देतात. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्याचे पण उपक्रम करतात.,किती ग्रंथालयं ते करतात हा प्रश्न आहे..?. इस्कॉन संचलित अक्षयपात्रसारखे भारतातील लाखो मुलांच्या जेवणाची सोय रोज करणारे आणि त्या माध्यमातून शालेय उपस्थिती वाढवणारे उपक्रम किती सामाजिक संस्था चालवतात? आणि differently abled व्यक्तींना रोजगारनिर्मिती सुद्धा करतात त्यातून . मग असं असताना मंदिरांच्या मदतीने कुठे कुठे ग्रंथालयं किंवा हॉस्पिटल उभे राहू शकतात किंवा ' जिथे मंदिर तिथे ग्रंथालयं ' अशा प्रकारचे उपक्रम राबवता येवू शकतील का हा समावेशक विचार का बरं मनात येत नाही ? ग्रंथालयं वाढवायची आहेत ना ? हॉस्पिटल वाढवायची आहेत ना ? मग लोकांच्या श्रद्धेचा आदर करूनसुद्धा ते होऊ शकतं ना !! Symbiotic(सहजीवन) विचाराने mutual coexistence (एकत्र अस्तित्व ) शक्य असताना मंदिर नकोच आणि फक्तं हॉस्पिटल आणि ग्रंथालये पाहिजेत हा एकतर्फी आणि असमावेशक विचार कशासाठी ?
ग्रंथालयांनी मंदिराची मदत घेवून लोकांपर्यंत पोहोचायला आणि नवीन पुस्तकांसाठी देणग्या उभ्या करायला काहीच हरकत नाही . ग्रंथालयं विरूद्ध मंदिरं किंवा हॉस्पिटल विरुद्ध मंदिरं असा असमावेशक आणि व्देष वाढवणारा प्रचार करण्याऐवजी दोन्हीच्या co-existence (एकत्र अस्तित्वाचा ) आणि परिणामी mutualism (दोन्हींच्या उन्नतीचा) चा प्रचार का केला जात नाही ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारला तर खरा प्रॉब्लेम काय आणि कुठे आहे ते कळेल .
ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज मोहिते;
आळंदी , पुणे.
@@@@@@@@@@@@@@

