shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि.प.हा.लोहा शाळेस माजी विद्यार्थी आनंद भोस्कर यांच्याकडून वाढदिवसाच्या निमित्ताने ५००१रू.रोख निधी सुपूर्द ......!!

लोहा । (वार्ताहर) :
श्री.आनंदराव भोस्कर सर,सहशिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर ता.लोहा यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जि.प.हायस्कूल लोह्याचा माजी विद्यार्थी म्हणून, माजी विद्यार्थी चळवळीत सहभाग म्हणून,जि.प.हा.लोह्याच्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी रु.५००१रोख रक्कम शाळेचे सहशिक्षक राजीव तिडके सर यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी,राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षककाशीनाथ शिरसीकर,शिक्षक काँग्रेसचे शिक्षक नेते, विठुभाऊ
चव्हाण,अखिलचे शिक्षक नेते, मुर्तुज शेख, अखिलचे ता.अध्यक्ष मंगल सोनकांबळे, पत्रकार तथा माजी विद्यार्थी, प्रदिपकुमार कांबळे आदी उपस्थित होते.श्रीयूत भोस्कर सरांचा आजचा वाढदिवस म्हणजे, एक आदर्शवत उदाहरण शिक्षक समूहासमोर उभे केले आहे.

ते आम्हाला अनुकरणीय असून  भविष्यात त्यांनी निर्माण केलेल्या मार्गाने आम्ही नक्कीच मार्गक्रमण करून आपण घालून दिलेली विधायक प्रथेची ज्योत आम्ही नेहमीसाठी तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील नक्कीच राहू,असे शाळेचे माजी विद्यार्थी मंगल सोनकांबळे यांनी बोलताना सांगितले.
close