नगर । प्रतिनिधी :
राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी ह.भ.प .अभिषेक जी महाराज जाधव( पानसवाडी) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकताच ह.भ.प.मारुती महाराज तुणतुणे शास्त्री यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्याचा विस्तार व्हावा, या इच्छेने संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य भिष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या आशीर्वादाने व ह भ प मारुति महाराज तुणतुणे शास्त्री, बापू महाराज रावकर, अरुण महाराज पिंपळे व संपर्क प्रमुख एकनाथ महाराज पठाडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच परभणी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. आकाश महाराज खोकले यांच्या प्रयत्नातून दक्षिण विभाग अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी ह.भ.प. अभिषेक महाराज जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

