shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिनांक: ०७ऑगस्ट, रात्री ७-०० वाजता..; जिल्ह्यात २४ तासात ५५९ रुग्णांची नोंद..; आज ३६८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज..!!

आज ३६८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

शिर्डी एक्सप्रेस सेवा 
अहमदनगर  :   जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६२.०५ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  कोपरगाव ०१, मनपा ०५, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०६, शेवगाव ०१, राहुरी ०१ , कर्जत ०१, नेवासा ०१, पारनेर ०२,श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३२१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ५०, संगमनेर ३४,  राहाता १०, पाथर्डी ३१, नगर ग्रामीण ११, श्रीरामपुर १०,  कॅन्टोन्मेंट १८,  नेवासा १९, श्रीगोंदा २३, पारनेर १२, अकोले ०५, राहुरी ०४,  शेवगाव २४,  कोपरगाव ३२, जामखेड ०९ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६५, संगमनेर ११, राहाता ०२, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट ०१,  नेवासा ०५, श्रीगोंदा ०३, पारनेर ०२, अकोले ०६, राहुरी ०१, कोपरगांव ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १३५, संगमनेर ३२, राहाता ०७, पाथर्डी १९, नगर ग्रा.१३,  श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट २०, नेवासा ४१, श्रीगोंदा २, पारनेर २९, अकोले ११,राहुरी ०१,  शेवगाव २, कोपरगाव १७, जामखेड ०२, कर्जत १५

बरे झालेले एकूण रुग्ण:५३३३

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३१६५*

*मृत्यू: ९६*

*एकूण रूग्ण संख्या: ८५९४*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
STAY HOME STAY SAFE
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका.
close