shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बनावट चेकच्या माध्यमातून गडचिरोली झेडपीतील २.८६ कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीला अटक ....!!

स्थानिक गुन्हे शाखेला २५ हजारांचे पारितोषिक..!! 

गडचिरोली  :- जिल्हा परिषदेतील बनावट चेकच्या माध्यमातून २.८६ कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीतील ६ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनकडुन अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बालकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बनावट चेक तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात यश मिळवल्याबद्दल २५ हजारांचे पारितोषिक जाहीर केले. 

गडचिरोली जिल्हा परिषरदेंर्गत माजी मालगुजारी तलाव पूनर्बांधणी व बळकटीकरण या लेखाशिर्षाखाली असलेल्या युनियन बँक खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम लंपास करण्यात आली होती. बँक खात्यात ६ कोटी २२ लाख ५९ हजार ३५१ रुपये शिल्लक असताना २ कोटी ८६ लाख रुपये एवढी रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केल्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बालकवडे यांच्या मार्गदर्शनात ६ पथके गठित करुन वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींना अटक करण्यात आली.स्नेहदीप श्रीराम सोनी (४७) रा. नंदनवन, केडीके कॉलेजजवळ नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल(५१) रा.रेड्डी,ता.कुरई,जि.शिवणी (मध्यप्रदेश), सुदीप श्रीराम सोनी (५१) रा.नाईक रोड महाल नागपूर, अमित मनोहर अग्निहोत्री (३५), रा.धनगवळीनगर हुडकेश्वर नागपूर, अतुल देविदास डुकरे(४२), रा.प्लॉट क्रमांक ६६ आशीर्वादनगर नागपूर व विनोद मंगलसिंह प्रधान (४७) रा.करडी, ता.मोहाडी, जि.भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. सोनी बंधू हे या प्रकरणातील मास्टरमाईंड आहेत.

 यात शांखेचे प्रभारी अधिकारी पो. निरिक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणण्याकरिता घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करून स्थानिक गुन्हा शाख्येच्या पोलिस अधीक्षकांनी त्यांना २५ हजारांचे पारितोषिक जाहीर केले.या गुन्हाचा तपास अपर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात पो. निरिक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे, पोलिस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस उपनिरीक्षक पूनम जगताप यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांचे यासाठी सहकार्य लाभले.
close