लोहा (प्रतिनिधी ):
लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे बुधवार दिनांक ४ ऑगस्टला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्यामुळे लोंढे सांगवी ग्रामस्थांनी विनाकारण काळजी करण्याचे कारण नसून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नम्र आवाहन लोंढे सांगवी चे आमदार शामसुंदर शिंदे यांचे कट्टर समर्थक आनंद देशमुख लोंढे सांगवी कर यांनी केले आहे .
लोंढे सांगवी येथे बुधवारी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीदायक वातावरण पसरले आहे.त्या गोष्टींची आनंद देशमुख लोढे सांगवीकर यांनी विशेष दखल घेत म्हटले आहे की, विनाकारण काळजी न करता सर्व नागरिकांनी मास्कचा व सॅनिटायझर चा वापर करावा व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे नम्र आवाहन युवा नेते तथा आमदार शामसुंदर शिंदे यांचे कट्टर समर्थक आनंद देशमुख लोंढे सांगवीकर यांनी लोंढे सांगवी ग्रामस्थांना केले आहे..

