shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवंतिकाबाई दांगट यांचे दुःखद निधन..!!



(माजी आयुक्त उमाकांत दांगट यांना मातृशोक)

केज / तालुका प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):  औरंगाबाद विभागाचे सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. श्री. उमाकांत दांगट केज चे माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट यांच्या मातोश्री अवंतिकाबाई गपतराव दांगट यांचे गुरुवारी रात्री ३.३० वाजता दुःखद निधन झाले त्यांचे मृत्यू समयी ९२ वर्षे वय होते.
        

अवंतिकाबाई दांगट ह्या वयोवृध्द असल्यााने  आठ दिवसापासून आजारी होत्या त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे गुरुवारी मध्यरात्री ३:३० वाजता निधन झाले.शुक्रवारी दुपारी  १ वाजता त्यांच्या केज येथील धारूर रोड या ठिकाणी अवंतिका गो तिर्थ या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

              
त्यांच्या पश्चात मुलगा माजी आयुक्त उमाकांत दांगट व पशुपतीनाथ दांगट यांच्यासह सहा मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
close