देहरे। प्रतिनिधी
मी नितीन भांबळ, राहणार देहरे तालुका नगर जिल्हा अहमदनगर. मला एक दिवस सर्दी झाली म्हणुन मी आणि माझा मित्र दत्ता खताळ विळद येथे एका हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टर बोलले सर्दी आहे जास्त काही नाही जर तुम्हाला वाटत असेल तर चेक करा. पण मला वाटलं की वेळेत जर काळजी घेतली तर पुढे अडचण येत नाही तशी ही मला काहि ही त्रास होत नव्हता.
मग आम्ही नगर ला साइदिप हॉस्पिटलमध्ये गेलो तेथे मी रैपिट टेस्ट केली .दुसर्या दिवशी माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.माझ्या पाया खालची जमीन सरकली व घाबरलो आणि पुढे दिसू लागले की आता मी मरनार. आमचे मित्र किशोर भुजबळ, दत्ता खताळ यांच्याशी मी बोललो. माझा इन्शुरन्स आहे तर आपण नोबेल ला जाऊ . तेथे गेल्यावर त्यांनी माझ्या छाती चे एक्सरे काढले सिटी स्कॅन केले. डॉक्टर बोलले की तुम्हाला लगेच ऑक्सिजन ची गरज आहे..मी घाबरलो आंणि किशोर पन घाबरला.
मी बोललो मला घरच्यांना शेवट भेटायचय कारन कोरोना म्हणजे मी मरणार... डॉक्टर बोलले लगेच ॲडमीट व्हावे लागेल. तोपर्यंत किशोर ने आमदार निलेश लंके (नेते) यांना फोन केला व सांगितले. नेते नितीन चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे व तो फार घाबरलेला आहे .
नेते माझ्या बरोबर बोलले की नितीन ऑक्सिजन किती आहे 95,96 आहे का. मी माझा रिपोर्ट त्यांना पाठवला. ते बोलले कुठे जाऊ नको तु पारनेर टाककी डोकेश्वर कोविड सेंटर ला ये. . मग मी, किशोर, दत्ता खताळ आम्ही परत घरी आलो. पन मी तो पर्यंत माझी बॅग भरायला सांगितली होती. मी आल्यावर घरचे घाबरले होते . मी बॅग घेतली संगळे रडायला लागले. मी पण रडायला लागलो व मी गाडीत बसलो. माझा भाऊ,किशोर,नाशिर हे मला सोडवायला निघाले.तेवढ्यात एकाने किशोर ला फोन करुन सांगितले तु नको जाऊ तुझ्या घरी लहान मुले आहेत तरी पन तो माझ्या बरोबर आला. मी त्यांना म्हटलो मी मागे बसतो , घाबरलेलो, फक्त डोक्यात एकच विचार येत होता आता मी मरनार. असे करत करत जेव्हा मी कोविड सेंटर ला पोचलो.
त्यानि मला सोडले ते पन निघाले किशोर च्या व माझ्या भावाच्या डोळ्यात पानी आल.ते बोलले घाबरु नको *देव पाठीशी आहे
मी आत गेलो आणि गेल्या गेल्या मला एक लहान मुलगा दिसला आनी तो बोलला
पेशंट आहात का तुम्ही
मी बोललो ...हो
तो बोलला ..काही नाही होत कोरोनानी
मला पण झाला, मी चकित झालो...
डॉक्टर आले आणि बोलले नितीन भांबळ आताच नेतेचा फोन आला होता. आणि मग मला चेक केल अक्सिजन...95,96 होता आणि म्हटले कशाला आले.
तुम्ही एकदम ठणठनित आहे मग मला फक्त पांच दिवसाच्या गोळ्या दिल्या..तेवढ्यात मला आमदार निलेश लंके यांचा फोन आला. टेन्शन घेऊ नको, निवांत रहा. सकाळी मी उठलो व सकाळी वातावरण पाहील्यावर माझ दुखणंं पळुन गेले कारन कोविड सेंटर मधे सगळे पेशट हे माझ्या वानिच कोनाला सर्दी झालेले तो पॉझिटिव्ह, डोक दुखत तो पॉझिटिव्ह. काहीनला काहीच नाही तो पॉझिटिव्ह. काही लहान मुले होती ते पण पॉझिटिव्ह.
एक दिड वर्षाचे बाळ ते पण पॉझिटिव्ह. मला कळाल याने काहीच होत नाही मी सगळ्यांन बरोबर बोलायला लागलो व ते पण माझ्या बरोबर बोलायला लागले .
सगळे तेच सांगयाचे काही नाही होणार कोरोना ने . आम्हाला काहीच होत नाही.
मग हळू हळू मित्र मिळाले ते पण छोटे -छोटे..
मग कोविड सेन्टर मधी सकाळी नास्ता, दुपारी जेवन, संध्याकाळी जेवण, आठवड्यातुन चार वेळेस मटन-चिकन मिळायचे एकदम सोय चांगली घरी कुणालाही जमणार नाही अशी. मग आमच्या रुम मधे पाच मुले आली अदित्य,साई,अरीजय, दादा दिदी हे संगळे अंदाजे बारा ते तेरा वर्षांचे होती त्याचे आईवडील जवळ नव्हते तिथे तरी ते फ्रेश राहायचे.
नेतेने मला त्याची जबाबदारी दिली होती. कोविड सेंटर जणू हे आमचे घर झाले आणि घराचा प्रमुख म्हणजे आमदार साहेब होते. आम्ही जसे एका कुटुंबात असल्यासारखे दररोज मस्ति केली. माझी आई पन पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथे आली पन निट होउन घरी गेली.
मी पन निट झालो कोरोना मला वाटला नाही.कारण कोविड चे वातावरण असे होते.मी शंब्दात सांगु शकत नाही. दररोज सकाळी मला राहुल झावरे, खिलांरी मामा, भेटायला यायचे ,लोंढे मामा,हे सर्व पण
मला सुटी झाली पन आमदार साहेबाचा फोन आला थोडे दिवस नितीन थांब कोविड सेंटर संभाळ,मी थांबलो मदत पन केली मला कोरोना काय आहे मला समाजल. जर टेन्शन घेतल तर मानसे मरतात हे कळाल.
आम्ही साई अदित्य,अरीजय,दिदी, मी दररोज सगळ्या पेशट बरोबर बोलायचो, प्रत्येकाच्या रुम मधे जाऊन सगळ्यांना कोलगेट,टावेल, साबन आहे का नाही,विचारायचं त्याची नावे घायची . कोन नविन आलय त्याच्या बरोबर बोलून त्यांना सागायचो टेन्शन नका घेऊ नका कोरोना म्हणजे काही मोठा रोग नाही.
माझी आई घरी गेल्यावर गावात चर्चा झाली नितीन ची आई आली मागुन जाऊन तो नाही आला मेला वाटत चर्चा चालु झाली मला गावातुन फोन जास्त प्रमाणात चालु झाले मी संगळ्यांना सांगतले ठिक आहे.ज्याचे माझ्या वर प्रेम होते त्यांनि मला संगळ्यांनी फोन केले. मी पंधरा दीवस थांबलो..शेवटी मला जाण्याची वेळ आली . त्या सकाळी माझे दैवत आमदार साहेबाचे मला फोन आला काळजी घे. विजु भाऊ औटी ची आज्ञा घेतली ....राहुल झावरे,खिलांरी मामा,यांची आज्ञा घेतली पन, जेव्हा मला नेण्यासाठी गाडी आली,मला निरोप देण्यासाठी सर्व जन ऊभे राहीले. लहान मुले रडायला लागले,मामा काळजी घ्या,मी रडत रडत बाहेर आलो...सगळे रडायला लागले.
सागायचे अस कोरोना म्हणजे भित्र पान आहे ,टेन्शन घेऊन लोक मरतात. कोरोना म्हणजे सध्या हॉस्पिटल वाल्याचे मोठे साधन झाले आहे. घाबरु नका.आमदार साहेब दैवत आहे तालुक्याचे जाच्या मुळे आज मी तुमच्यात परत सुखरूप आलो ह्या कोविड सेंटर मधे एक रुपया पन लागत नाही आणि आपल्याला एकदम घरी असल्या सारखे वाटते असे हे कोविडं सेन्टर आहे
मी परत एकदा आमदार साहेब याचे मनापासून आभार मानतो.
आणि सगळ्यांना सांगतो की कोरोना ला घाबरू नका मनात भीती ठेवू नका होऊ द्या सर्दी हलू द्या खोकला हे झाले म्हणजे कोरो ना झाले असे नाही...
आपले ऑक्सिजन लेवल ही 95 च्या पुढे ठेवा आणि ही असेल तर तुम्ही नॉर्मल आहात असे समजा
काळजी घ्या...!!

