(दैनिक सामनाचे हिंगोली प्रतिनीधी योगेश पाटील यांचा ह्रदयविकाराने मृत्यु झाल्याने त्यांचे कुटुंबीय अडचणीत असल्याने त्यांना तात्काळ शासनाने आर्थिक मदत द्यावी)
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१८,राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोणा ने बळी गेलेल्या पत्रकारांचा नातेवाईकांना कोरोणा योद्धे म्हणून पन्नास लाख रुपयांची मदत करावी या मागणीचे सेनगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्राना सेनगाव तहसीलदार जिवकुमार कांबळे यांच्या मार्फत दि.१८ सप्टेंबर शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले .
या संबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि राज्यात विविध रुग्णालयात ५० हुन अधिक पत्रकार कोरोणाची लागण झाली असल्याने उपचार घेत आहेत.आजपंर्यत २५ पत्रकाराचे बळी गेले आहेत.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार कोरोणा योध्दै असून मृत्यु पावलेल्या पत्रकारांचा नातेवाईकांना पन्नास लाख रुपये मदत करण्याची घोषणा केली होती.त्याची अमलबजावणी करावी .राज्यातील सर्व पत्रकारांचा आरोग्य विमा काढून त्याना आरोग्य सुरक्षेच कवच दावे तसेच दैनिक सामनाचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे ह्रदयविकाराने मृत्यु झाल्याने त्यांचे कुटुंबीय अडचणीत आले असून त्यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत द्यावी या संबंधी तातडीने निर्णय घावा.कोरोना बाधित पत्रकार रुग्णांना प्राधान्याने बेड उपलब्ध व्हावे अशी मागणी या वेळी करण्यात आली.या निवेदनात करण्यात आली.या वेळी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख,तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख,विश्वनाथ देशमुख,जगन्नाथ पुरी,गजानन वाणी,नामदेव मुंडे,जगन्नाथ.वाढेकर,विठ्ठल देशमुख,भारत शिंदे,केशव भालेराव,रमाकांत पोले आदी पत्रकार उपस्थितीत होते.

