shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील पूरसदृश्य परिस्थितीची खा.लोखंडे कडून पाहणी..!!


नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश..!!

सावळीविहीर(प्रतिनिधी) :
शिर्डीत काही वसाहती मध्ये पूर सारखी परिस्थिती सारखी निर्माण झाली होती.येथे आलेल्या पाण्यामुळे शेतकरी व घरमालकाचे मोठे नुकसान झाले आहे .अशा नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण लक्ष घालून शासनाकडून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून  देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन यावेळी  खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.

शिर्डी येथे लेंडी नाल्याला पाणी येऊन अनेक वसाहती मधल्या घरांमध्ये शिरून घरांचे नुकसान झाले होते तसेच  शिर्डी येथे  अनेक ठिकाणी या पाण्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले .अशा पूरपरिस्थिती ग्रस्त भागाला  आज  शुक्रवारी  शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे  खासदार सदाशिव लोखंडे यांनी  भेट देऊन पाहणी केली  व  तात्काळ  उपस्थित अधिकाऱ्यांना  या नुकसान ग्रस्तांचे पंचनामा करण्याचे  तातडीने आदेश दिले.त्यांनी शिर्डीत लेंडीनालाची पुर परस्थितीची पाहणी करून या नाल्यावर मोठ मोठ्या हाँटेल मालक व बिल्डर यांनी जे अतिक्रमण केले आहे. 

त्या सर्व अतिक्रमणांची मोजणी करून निमगाव व शिरडी हद्दीतील सर्व नाला मोकळा करावा .अन्यथा भविष्यात अतिवृष्टी व  पाण्यामुळे  नागरिकचे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे त्वरित येथे योग्य ते पाऊल उचलून उपाययेजना करायला हवी आहे .असे त्यांनी सांगितले. श्री साईबाबांच्या काळातील महत्त्वाचा असणारा ह्या लेंडी नाल्याचे पावित्र्य जपावे व कायम  स्वरूपी येथे उपाययोजना करावी. असे खासदार लोखंडे यांनी यावेळी सांगितले. 

तसेच या वेळेस शिरडी न.पं बी, व्ही, जी,कं, च्या स्वछता कामगारचे पगार न.प. ने त्वरित करावेत व कामगारनी काम सुरु करावे.असे सांगुन  श्री साईबाबा संस्थानमधील कत्राटी कामगारची कोरोना काळातील पगार  कपात होणार असुन ती रद्द करावी. यासाठी श्री साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मार्ग  काढण्याचा आपण प्रयत्न करू.असे आश्वासनही यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी उपस्थितांना दिले.

याप्रसंगी राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे , न,पं,चे मुख्यधिकारी काकासाहेब डोईफोडे ,का,तलाठी झेंडे  व ईतर अधिकारी उपस्थितीत होते.तसेच शिवसेना नेते कमलाकर कोते पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे , माजी विश्ववस्त  डॉ. एकनाथ गोंदकर , नगरसेवक अभय भैय्या शेळके , शहर प्रमुख भाजपचे शिवाजी गोंदकर ,मा.नगरसेवक विजय जगताप ,राहुल गोंदकर जयराम कादळकर ,महेंद्र कोते महेश महाले ,सुनील बारहाते ,मा नगरसेवक रमेश गोंदकर , मनसे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते ,शिवप्रहार जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले,शहर प्रमुख शिवसेना सचिन कोते ,शहर संघटक अमोल गायके, शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय तळेकर , उपशहरप्रमुख सुयोग सावकारे, विश्वजित बागुल,  उपतालुकाप्रमुख विठ्ठल पवार , पुंडलिक बावके  , अनिल पवार,कीरण कांदळकर  सुभाष उपाध्ये,सागर जगताप योगेश कोते, हेमंत गोरडे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते, तसेच इतर पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक व संबंधित पूरग्रस्तही उपस्थित होते.
close