shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींकडून पिडीत कुटुंबियांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी..!!


  • केज पोलिसांत पुन्हा गुन्हा दाखल,११ दिवसापासून पसार आरोपींचा पोलिसांना शोध लागेना..!

केज / तालुका प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे):- सतत होणा-या शारीरिक,मानसिक त्रासाला कंटाळून रावसाहेब शेषेराव जोगदंड यांनी विषारी औषध प्राशन करूण आत्महत्या केल्याप्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादिवरूण केज पोलिसात २६ ऑगस्ट रोजी पाच आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असतानाच आरोपिकडून पुन्हा मयताच्या फिर्यादी मुलास जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सततच्या ञासाला कंटाळून केज तालुक्यातील येवता येथिल शेतकर्यांने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याप्रकरणी मयताचा मुलगा श्रीराम रावसाहेब जोगदंड यांच्या फिर्यादिवरूण १) बाळासाहेब अरूण जोगदंड २) अरूण उत्तम जोगदंड ३) रमेश अरूण जोगदंड ४) सुशिल अरूण जोगदंड  ५) रामभाऊ आच्युत जोगदंड या पाच आरोपी विरोधात केज पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान ४/९/२०२० रोजी दु.१२ वाजणेच्या दरम्यान मयताचा फिर्यादी मुलगा श्रीराम जोगदंड हा आपल्या शेतातील विहरीवर असताना मागील गुन्ह्यातील आरोपी नामे-१) बाळासाहेब अरूण जोगदंड २) अरुण उत्तम जोगदंड यांनी आमच्यावर दाखल केलेली केस मागे घेतली नाहीस तर तुला जिवे मारूण टाकूत अशी धमकी दिल्याप्रकरणी पुन्हा या आरोपी विरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील ११ दिवसांपासून केज पोलिसांना आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या भूमीके विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
close