shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा येथें सन्मान गुणी विद्यार्थ्यांचा..!!



राहूरी : प्रतिनिधी 
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील विविध शाळांतील इयत्ता १० वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आज दि.५ सप्टेंबर(शिक्षक दिन) रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमास नाशिक विभाग म्हाडा अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)शिवाजीराव ढवळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, मुंबई येथील सुनील भालेराव, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,  डॉ.भागवत वीर व मान्यवर उपस्थित होते.
close