अहमदनगर - देवळाली प्रवरा हद्दीतील राहुरी फॅक्टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांसाठी पादचारी भुयारी मार्गाची तरतूद करावी यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढुस यांचेसह सिस्टमंडळाने अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देऊन मागणी केली.
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, डॉक्टर केमिस्ट चे संस्थापक डॉ. विलास पाटील, डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अरुण ढुस, डॉ. नामदेव कडू, दत्तात्रय चव्हाण, मच्छिन्द्र टेकाळे, सुरेंद्र टिककल आदी नागरिकांच्या सह्या असलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर मनमाड महामार्ग नूतनीकरण कामासाठी निधी मंजूर होऊन लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाली असून राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या चौकात जवळपास तीन हजार शाळकरी विद्यार्थी रस्ता ओलांडतात त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतुकीस अडथळा निर्मान होत आहे.
भविष्यात या ठिकाणी मुलांची वाढती संख्या आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता येथे अपघात वाढणार आहेत, मुलांच्या जीवितास असलेला भविष्यातील संभाव्य धोका लक्ष्यात घेऊन या ठिकाणी मुलांना शाळेत जायला रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी पादचारी मार्ग होणे आवश्यक आहे.
तरी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर शाळकरी मुलांना रस्ता ओलांडणेसाठी पादचारी भुयारी मार्गाची तरतूद करावी अशी विनंती निवेदनात केली आहे.अहमदनगर येथे सहा. अधिक्षक अभियंता एस जी मेहेत्रे साहेब यांना निवेदन देताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे समवेत राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, डॉक्टर केमिस्ट चे संस्थापक डॉ. विलास पाटील, डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक अरुण ढुस, डॉ. नामदेव कडू, दत्तात्रय चव्हाण, मच्छिन्द्र टेकाळे, सुरेंद्र टिककल आदी नागरिक निवेदन देणेसाठी उपस्थित होते.

