अ'नगर प्रतिनिधी । राधेश्याम कुसमुडे :
स्वातंत्र्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघात १२ आमदार झाले प्रत्येक आमदाराने आपल्या कालावधीत सामाजिक कार्यासाठी आपआपल्या परीने भरपूर निधी आणला परंतु तरूणांना शाश्वत कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध होईल असे काम मात्र फक्त नामदार शंकरराव गडाख साहेबांनीच केले हे कोणीही नाकारू शकत नाही. त्या उल्लेखनीय कामामध्ये मुळा कारखान्याचा नगर जिल्ह्यातील पहिला को जनरेशन विज प्रकल्प सर्वात अगोदर यशस्वी करून दाखवला. मुळा कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता २५०० टनावरून ६००० टनावर आणली. नेवासा तालुक्यात कापूस उत्पादकांची परवड होत होती कापूस उत्पादकांची अडचणी दुर करण्यासाठी नुकतेच मुळा सूतगिरणीची परवानगी आणली.
अतिरिक्त उसाचे गाळप करून ऊस उत्पादकांना जास्त फायदा होण्यासाठी केन्द्र शासनाच्या धोरणानुसार आधुनिक ईथेनाॅल प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. त्याच बरोबर मुळा कारखाना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिस्टिलरी प्रकल्प लवकरच उभा राहत आहे. नामदार शंकररावांच्या मार्गदर्शनाखाली मुळा दुध संघ प्रगती पथावर आहे. नामदार शंकरराव गडाख साहेबांचे आणखी एक उल्लेखनिय काम म्हणजे घोडेगाव कांदा मार्केट आज महाराष्ट्रात घोडेगाव कांदा मार्केटचा नावलौकिक खुप मोठा झाला आहे. पांढरीपुल MIDC मध्ये आज पर्यंत जे ऊद्योगधंदे आलेत ते नामदार साहेबांमुळेच... अलिकडेच पांढरी पुल MIDC मध्ये अजून ऊद्योगधंदे येण्यासाठी उद्योगमंत्री अनिल देसाई यांची भेट घेऊन MIDC ला चालना देण्याचे सांगितले नामदार शंकररावामध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे असे एकंदरीत लक्षात येते. जनतेचा त्याच वेळी ख-याअर्थांने विकास होतो जेव्हा त्या जनतेचे प्रतिनिधीत्व करणा-या नेत्याला काळाची पावले ओळखता आली पाहिजे... जनतेच्या ताकतीच्या जोरावर विकास प्रकल्प आणता आले पाहिजे तेंव्हाच आम जनता प्रगतीचे शिखर गाठु शकते.
सर्वसामान्य जनतेचे नेत्यावरील विश्वास, प्रेम व जनतेने दिलेली आशिर्वाद रूपी ताकत आणि नेत्याची जनतेप्रति विकासाची तळमळ, आत्मीयता, बांधिलकी या गोष्टींचा संगम झाल्यास त्या परिसराचा सर्वांगीण विकास, प्रगती आणि नावलौकिक कोणीही रोखू शकत नाही. या बाबतीत नेवासा तालुका आज भाग्यवान ठरत आहे. नेवासा तालुक्यातील जनतेने नामदार शंकररावामागे मोठी ताकद निर्माण केल्यामुळेच नेवासा तालुका प्रगतीचे एक एक शिखर सर करत आहे. भविष्यातही हिमालय पर्वताऐवढे शिखर सर करत राहावे अशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या, हितचिंतक, मित्र मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक, सगेसोयरे यांच्या वतीने जगतगुरु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना...!
जनतेची ताकद, प्रेम आणि भरोसा हीच नेत्याची काम करण्याची ऊर्मी, ऊर्जा असते. त्यामुळेच लोकप्रतिनिधी अशक्यप्राय कामे आपआपल्या तालुक्यात यशस्वी करून सगळ्यांपुढे आदर्श ठेऊ शकतात. भविष्यातही मोठे मोठे प्रकल्प नेवासा तालुक्यात आणण्यासाठी नामदार शंकरराव गडाख साहेबांमागे आणखी मोठी ताकत उभी करावी. सारासार विचार करून राजकारणाच्या पलिकडे जाऊन वस्तु स्थितीला धरून राजकारण विरहीत विचार मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...!!!
शब्दांकन,
तागड मामा,
कांदाआडतदार, घोडेगाव,
ता. नेवासा, जि. अहमदनगर.

